गोविंदांना वेगळे आरक्षण नाही; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

Read Time:2 Minute, 29 Second

मुंबई : सरकारने दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देऊ केले आहे. यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या घोषणेला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांना वेगळे आरक्षण नाही खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

गोविंदांना पाच टक्क्याचा आरक्षण नाही. सर्व प्रकारच्या खेळाडूंना पाच टक्क्याच आरक्षण आहे. खेळाडूच दर्जा मिळाल्यानंतर त्याची मानके तयार होतील. एक दिवस कोणी गोविंदा खेळायला गेले म्हणून आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण गोविंदांना देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.

गोविंदांना खेळाडूंचा दर्जा देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. ज्या सुविधा इतर खेळातील खेळाडूंना लागू असतात त्या सर्व सुविधा आता गोविंदांनाही लागू असतील. तसेच, राज्य सरकारने खेळाडूंना नोक-यांमध्ये दिलेल्या ५ % आरक्षणाचा लाभ गोविंदांनाही मिळणार आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten − 5 =