January 19, 2022

गोवर्धनघाट स्मशानभूमीलगतचे अतिक्रमण हटविले

Read Time:3 Minute, 20 Second

नांदेड :प्रतिनिधी

गोवर्धनघाट येथील शांतीधाम स्मशानभुमिलगत अनेक वर्षापासून असलेले काही घरांचे अतिक्रमण मनपाच्या वतिने रविवारी सकाळी हटविण्यात आले.येथील रहिवाशांनी विरोध केल्याने पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवावे लागले.दरम्यान या जागेवर सात कोटी रूपये खर्चातून गॅस दाहिनी उभारण्यात येणार असून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सदर कामाचे भुमिपूजन होणार असल्याची माहिती मनपाकडून मिळाली आहे.

अंत्यसंस्कारासाठी शहर परिसरात महापालिकेच्या वतिने उपलब्ध असलेल्या गोवर्धनघाट,नावघाट,सिडकोसह सर्व धर्मीयांसाठी असलेल्या घाटांवर कोरोनाच्या संकट काळात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.सध्या या घाटांवर पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्काराचा सोपस्कार पार पाडला जातो.मात्र मागील काही वर्षांपासून महापालिकेने गोवर्धनघाट येथील शांतीधाम स्मशानभुमित विद्युत अथवा गॅस दाहिनीची सोय करावी अशी मागणी पुढे आली होती.यासाठी काही दारशुर व्यक्तींची मदत घेण्याचे ही ठरले होते.यानूसार येथे गॅस दाहिनी उभारण्याच्या हालचालिंना वेग आला आहे.पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सदर कामाचे भुमिपूजन होणार असल्याची माहिती मनपाकडून मिळाली आहे.

यामुळे प्रस्तावित दाहिनीसाठी गोवर्धनघाट येथील स्मशानभुमिलगत असलेल्या मनपाच्या जागेवरील आठ ते दहा घरांचे अतिक्रमण मनपाच्या वतिने हटविण्यात आले.मागील अनेक वर्षापासून काही लोकांनी या जागेवर अतिक्रमण करून कच्ची घरे बांधली होती. त्यामुळे लोकांनी या कारवाईस विरोध केल्याने काही वेळ तनाव निर्माण झाला होता. अखेर रविवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले.यावेळी डिवायएसपी देशमुख,पोनि जगदिश भंडरवाड,सहायक आयुक्त डॉ.रईसोदिन,राजेश चौरे,डॉ.बेग,अतिक्रमण विभागाचे राजेश चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आल्याने येथील रहिवाशी संतप्त झाले असून आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे यांची भेट घेऊन आपले गा-हाणे मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − three =

Close