
गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयास भारतरत्न डॉ. नानाजी देशमुख यांचे नाव द्या राज्यसरकारकडे कार्यकारी परिषदेचे सदस्य भागवत देवसरकर यांची मागणी
नांदेड प्रतिनिधी दि. 17 –
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत गोळेगाव ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली येथील कृषी महाविद्यालयास हिंगोली जिल्हाचे सुपुत्र थोर समाजसेवक भारतरत्न डॉ.नानाजी देशमुख यांचे नाव देण्यात यावे व भूमीपुत्राचा गौरव करावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.
हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले भारतरत्न डॉ.नानाजी देशमुख यांचं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे. देशभर अमूल्य योगदान आहे. गोळेगाव जि. हिंगोली येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय आहे. येणार्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत नाव देण्याचा ठराव व प्रस्ताव मांडणार असल्याचेही भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ निर्णय घेऊन भारतरत्न कै.नानाजी देशमुख कृषी महाविद्यालय गोळेगाव ता.औंढा जि.हिंगोली असं नामकरण करून प्रस्तावास मान्यता द्यावी व महाविद्यालयाचे नामकरण करावे, अशी आग्रही मागणी देखील भागवत देवसरकर यांनी केली आहे.