August 19, 2022

गुवाहाटी एक्स्प्रेस अपघात; मृतांची संख्या ९वर

Read Time:1 Minute, 43 Second

कोलकाता : गुवाहाटी एक्स्प्रेसचे १२ डबे गुरुवारी सायंकाळी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यातील दोमोहानी नजिक रुळांवरून घसरून उलटल्याने झालेल्या अपघातामधील मृतांची संख्या ९वर पोहचली आहे. या अपघातामध्ये ४५ हून अधिक लोक जखमी झाले. अपघातग्रस्त ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये अजूनही अनेक प्रवासी अडकून असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रवाशांचे बचाव कार्य सुरु आहे.

जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना सिलगुडीमधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर जलपैगुडी आणि मैनापुरीमध्ये उपचार सुरु आहेत. जमिनीपासून वर आलेल्या रुळांच्या बाजूला अनेक डबे पडले असून, बचावकार्य करणारे स्वयंसेवक त्यांतून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
अपघातात शुक्रवार सकाळपर्यंत नऊ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. ४५ हून अधिक जखमी झाल्याची माहिती जलपैगुडीच्या जिल्हा दंडाधिका-यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे अपघाताबद्दल चौकशी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × three =

Close