“गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?”

Read Time:2 Minute, 11 Second


मुंबई | शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला उच्च न्ययालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. या जल्लोषावर भाजप (bjp) आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी प्रतिक्रिया दिलीये.

गुलाल उधळत एवढं नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलं आहे का? भाजपला दहीहंडीच्यावेळी जांबोरी मैदान मिळालं. मग भाजपनेही असंच नाचायला हवं होतं का? असा सवाल नितेश राणेंनी केलाय.

आम्ही दहीहंडीच्यावेळी जांबोरी मैदान मिळवलं. तेव्हा भाजपने नाचून दाखवायचं होतं का? साधं एक मैदान मिळालं तर एवढं नाचतायहेत. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नावेळी तर हे सी-लिंकमध्ये उड्याच मारतील, असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय.

शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भांडायला लागते हे त्यांचं अपयश नाही का? एक साधं मैदान तर जिंकलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच करावा लागतो. त्यांना योग्य वाटलं तसा त्यांनी निर्णय दिला. पण आदित्यचं काय एखाद्या मुलीशी लग्न ठरलं आहे का? मग एवढं गुलाल उधळत नाचायची गरज काय?, असा सवाल नितेश राणेंनी शिवसेनेला केलाय.

थो़डक्यात बातम्या- 

‘…तर शिंदे सरकार कोसळणारच’; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य

राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − three =