गुरूवारी 1053 कोरोनाबाधित, 9 बाधितांचा मृत्यू; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

नांदेडकरांसाठी मार्च महिना जणू धोक्याची घंटा घेऊन आला आहे. मागील आठवडाभरापासून तर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या हजाराने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडा देखील वाढला आहे. गुरुवारी (ता. २५) प्राप्त झालेल्या तीन हजार ९८१ अहवाल प्राप्त झाले. यातील दोन हजार ७८८ निगेटिव्ह तर एक हजार ५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नांदेडकरांनो सावधान व्हा आणि वेळीच काळजी घ्या असे म्हणायची वेळ आली आहे.

गुरुवारी दिवसभरात ५४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतार्यंत २७ हजार ३२८ कोरोनाबाधित रुग्णांनी आजारावर मात केली आहे. गुरुवारी साईनगर नांदेड महिला (वय ४९), धनेगाव नांदेड पुरुष (वय ६०), कुंटुंर तालुका नायगाव पुरुष (वय ४८), भंडारी नगर नांदेड पुरुष (वय ६५), तरोडा नांदेड महिला (वय ८५), लोहा पुरुष (वय ६०), होळी नगर नांदेड पुरुष (वय ७५), उमरगा तालुका कंधार पुरुष (वय ७०), भावसार चौक नांदेड येथील पुरुष (वय ५५) या बाधितावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान गुरुवारीवरील नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोना आजाराने जिल्ह्यातील एकुण ६८३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

एकुण बाधितांची संख्या ३६ हजार ५५५ 

गुरुवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात – ६७३, नांदेड ग्रामीण – ५१, अर्धापूर – ३०, नायगाव – २०, भोकर -१९, उमरी – १७, बिलोली -१७ , कंधार – चार, मुदखेड – ४१, लोहा – ६०, धर्माबाद – १३, हिमायतनगर – दोन, किनवट – ३२, हदगाव – १०, देगलूर -१२, मुखेड – चार, माहूर – २४, यवतमाळ – दोन, परभणी – एक, हैदराबाद – दोन असे एक हजार ५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ३६ हजार ५५५ इतकी झाली आहे. सध्या आठ हजार ३११ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

तीन शासकीय रुग्णालयात ६९ खाटा शिल्लक

त्यापैकी ९३ कोरोना बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ४१४ स्वॅबची तपासणी सुरु होती. गुरुवारी सायंकाळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नऊ, जिल्हा शासकीय रुग्णालयात २० आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णालयात ४० खाटा उपलब्ध होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen + 18 =

vip porn full hard cum old indain sex hot