July 1, 2022

गुरुद्वा-यात तालिबान्यांचा पुन्हा धुडगूस

Read Time:2 Minute, 52 Second

काबुल : काबुलच्या गुरुद्वारात दहशतीचे सावट आहे, कारण गेल्या १० दिवसांत दुस-यांदा तालिबानचे दहशतवादी गुरुद्वारात घुसल्याची माहिती मिळते आहे. स्थानिक शीख नागरिकांनी सांगितले की, शुक्रवारी शस्त्रास्त्रे असलेले तालिबानी गुरुद्वारामध्ये घुसले आणि शोधाशोध केली. हेच नाही तर लोकांना घाबरवले. ही घटना काबूलच्या गुरुद्वारा दशमेश पिता श्री गुरु गोविंद सिंह कार्टे परवन इथे घडली. यापूर्वीही तालिबानी दहशतवादी गुरुद्वारामध्ये घुसले होते.

स्थानिक शीख समुदायाच्या एका सदस्याने फोनवर सांगितले, तालिबानी दहशतवादी गुरुद्वारामध्ये घुसले. त्यांनी गुरुद्वा-यात शोधाशोध केली आणि आम्ही रायफल आणि शस्त्रे लपवत असल्याचा दावा केला. त्यांनी सध्याचे आमचे खासदार नरेंद्र सिंह खालसा यांच्या कार्यालयाचीही झडती घेतली. खालसा सध्या भारतात आलेले आहेत. तालिबानी म्हणाले की, आमच्या गुरुद्वारा अध्यक्ष आणि समाजाच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी तालिबानच्या वरिष्ठ अधिका-यांना बोलावून इथे काय घडत आहे ते सांगितले. मशिदींमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये शेकडो शिया मुस्लिम मारले गेले आहेत, ज्यामुळे हिंदू आणि शीख भयभीत झाले आहेत. आम्हाला एवढेच हवे आहे की, आम्हाला लवकरात लवकर येथून बाहेर काढा. आम्हाला इथे मरायचे नाही.

गुरुद्वाराच्या रक्षकाल तालिबान्यांची धमकी
५ ऑक्टोबर रोजी सशस्त्र तालिबान्यांनी गुरुद्वाराच्या आत घुसून परिसर तोडफोड केली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, हेच नाही तर गुरुद्वाराच्या सुरक्षारक्षकांना धमकावले. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मला काबूलमध्ये अडचणीत असलेल्या शीख समुदायाकडून फोन येत आहेत. गुरुद्वारामध्ये उपस्थित असलेल्या समुदाय सदस्यांना धमकावले आणि पवित्र स्थळाचे पावित्र्य भंग केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 − 4 =

Close