August 19, 2022

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के

Read Time:2 Minute, 12 Second

गुजरातच्या कच्छ भागात ४.१ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. आयएसआर या भूकंपाचे संशोधन करणाºया संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदूू धोलावीराच्या जवळ होता. तेथील स्थानिक प्रशासनाने सांगितले की मध्यम तीव्रतेच्या या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा इतर कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

गांधीनगर येथे असणाºया आयएसआर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी १२ वाजून ८ मिनिटांनी ४.१ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप आला. याचे केंद्र कच्छमधील धोलावीरापासून २३ किलोमीटरवर पूर्व आणि आग्नेय भागात होते. हा भूकंप ६.१ किलोमीटरच्या खोलीत नोंदवण्यात आला. याआधी ४ आॅगस्टला याच जिल्ह्यात ४.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप आला होता.

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ४ आॅगस्टला संध्याकाळी ४.० रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू रापर जवळ होता. स्थानिक अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आयएसआरच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार ४.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप संध्याकाळी सात वाजून १४ मिनिटांनी नोंदवण्यात आला. या भूकंपाचा केंद्रबिंदू रापरच्या पश्चिम आणि वायव्येस २५ किलोमीटर अंतरावर जमिनीखाली सहा किलोमीटरवर होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

seven + five =

Close