January 21, 2022

गावठी पिस्टलसह ४ जिवंत काडतूस जप्त

Read Time:4 Minute, 9 Second

लातूर : इंडिया नगर येथील दोन संदिग्ध युवक कारमध्ये बसून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुभेदार रामजी नगरकडे जाणारे रोडचे टी-पॉईंट जवळ सापळा लावला. सदर कार आली असता ती उभा करून झाडा झडती घेतली असता कारचे डॅशबोर्डच्या कप्प्यात एक गावठी पिस्टल व त्यामधील मॅक्झिन मध्ये चार जिवंत काडतूस व एक पिस्टल सारखे दिसणारे लाइटर मिळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन १ लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील घडलेले गुन्हे, अवैध धंदे विरुद्ध कारवाई करण्यासाठी वेळोवेळी आदेशित करून मार्गदर्शन केले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे पथक अवैध धंदे, अवैध कारवाया व चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्याकरिता माहितीचे संकलन करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, लातूर येथे राहणारे दोन व्यक्ती विनापासपरवाना गावठी पिस्टल बाळगुन आहेत. ते थोडयाच वेळात जुना रेणापूर नाकाकडून एमआयडीसी रोडने त्यांचे कार मधून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुभेदार रामजी नगरकडे जाणारे रोड रोडचे टी-पॉईंट जवळ सापळा लावला.

थोडयाच वेळात टाटा विस्टा कार क्रमांक एम. एच. १७ ए. जी. ५५४७ ही जुना रेणापूर नाकाकडून येताना दिसली. त्या कारला सापळयातील पोलीस अंमलदारांनी हात करून थांबविले व कार मधील दोन व्यक्तींना कारच्या खाली उतरवून नाव विचारले असता त्यांनी सद्दाम बडेसाब शेख (वय २० रा. सूळ नगर, इंडिया नगर, लातूर), मोहम्मद खलील मोहम्मद हुसेन शेख (वय २८ रा. हुसेन कॉलनी, इंडिया नगर, लातूर) असे सांगीतले. सदर कारची झडती घेतली असता कारचे डॅशबोर्डच्या कप्प्यात एक गावठी पिस्टल व त्यामधील मॅक्झिन मध्ये मध्ये चार जिवंत काडतूस व एक पिस्टल सारखे दिसणारे लाइटर मिळून आले. त्यांना पिस्टलच्या परवाना विषयी विचारले असता त्याने कसल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगताच त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल आणि नमूद कार पोलिसांनी जप्त केली आहे.

चोरी, घरफोडीची दिली कबूली
सूळ नगर, इंडिया नगर येथील सद्दाम बडेसाब शेख यास अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने त्याच्या इतर साथीदारांसह एमआयडीसी लातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोकलेन मशीनचे ब्रेकर चोरल्याचे, तसेच बार्शी रोडवर घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे यांच्या फिर्यादी वरून एमआयडीसी लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × three =

Close