June 29, 2022

गाण्यांप्रमाणे वहिनीच्या बोलण्याला ताळमेळ नाही

Read Time:2 Minute, 16 Second

मुंबई : लखीमपूर हिंसाचारा निषेध म्हणून सोमवारी सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावलाय. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस या सक्रीय राजकारणात नसल्या तर त्या ट्वीटर किंवा अन्य माध्यमातून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरही अमृता फडणवीसांनी टीका केलीय. आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न अमृता फडणवीस यांनी केलाय.

अमृता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसे त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचे आणि अर्धवट ज्ञानाचे परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असे ट्वीट चाकणकर यांनी केलंय.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी. असे म्हणत टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − ten =

Close