January 19, 2022

गणेश नगरकडे जाणारा रस्ता रहदरीसाठी खुला

Read Time:2 Minute, 2 Second

नांदेड : प्रतिनिधी

स्रेहनगर येथील आयुक्त निवासस्थानाबाहेरील पाण्याच्या टाकीचा मलबा हा गणेश नगरकडे जाणा-या वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत होता याबाबत एकमतने शनिवारी सचित्र वृत्त प्रकाशीत केले होते. याची तात्काळ दखल घेत महापालिका आयुक्तांनी हा मलबा हटविण्याच्या सुचना दिल्या नंतर मलबा काढण्यात आला असुन, या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

सार्वजनिक विभागाअंतर्गत स्रेहनगरातील महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानाबाहेर बांधण्यात आलेली ३५ वर्ष पाण्याची जुनी टाकी मंगळवार दि.७ डिसेंबर रोजी पाडण्यात आली होती. सदर पाण्याची टाकी पाडण्यासाठी शासकीय विश्रामगृह ते गणेशनगरकडे जाणारा रस्ता बॅरीके उभारून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. टाकी पाडल्यानंतर मलबा रस्त्यावर पडून होता.यामुळे तीन दिवस उलटुनही सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे गणेशनगर, काबरा नगरकडे जाणा-या वाहनधारकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत होता. या बाबत देैनिक एकमतमधून शनिवारी आयुक्तांची टाकी वाहतुकीसाठी डोकेदुखी या मथळयाखाली सचित्र वृत प्रकाशीत केले होते.याची दखल घेत मनपा आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनंतर कर्मचा-यांनी पाण्याच्या टाकीचा मलबा उचलून गणेशनगरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + nineteen =

Close