
गट विकास अधिकारी मारहाण प्रकरण जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नांदेड(प्रतिनिधी) बिलोली येथील गट विकास अधिकारी . प्रकाश नाईक यांना दि.१० रोजी पंचायत समिती बिलोलीचे उपसभापती शंकर माधव यंकम यांनी सभापती निवासस्थानी बोलावुन आतुन कोंडी लावून एकेरी भाषेचा उल्लेख करून तुझा मोबाईल कसाकाय बंद आहे. असे बोलून आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्यामुळे उपसभापती विरोधात FIR दाखल करण्यात आला होता. परंतु मागील दोनदिवामध्ये संबंधितास सदरील गुन्हामध्ये अटक न झाल्यामुळे जिल्हयातील अधिकारी व कर्मचारीयांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असुन त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने शुक्रवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच अगामी काळात संबंधितास अटक न झाल्यास दि. १५ नोव्हेंबर रोजी पोलिस स्टेशन बिलोली वर देखील मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित) संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी केली.
हा जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित) संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेंद्र तुबाकले अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, सुधीरठोम्बरे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्र व्ही. आर. पाटील वित्त अधिकारीरावसाहेब कोलगणे ,कार्यकारी अभियंताअमोल पाटील ,उप लेखा व वित्त अधिकारी शेखर कुलकर्णी ,शिक्षणाधिकारी सविता बिरगे , चौधरी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, रुईकर, गट विकास अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव गडडापोड, भालके, के. व्ही. बळवंत, बळदे तसेच जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.१२ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर अधिकारी व कर्मचारी यांच्या मोर्चा काढण्यात येवुन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांना जिल्हयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भावना अवगत करून एवढा गंभीर गुन्हा होऊन देखील पोलिस प्रशासनाकडुन अदयाप पर्यंत सदरील आरोपीस अटक न केल्यामुळे संबंधितास तात्काळ अटक करण्याबाबत जिल्हाधिकारी महोदय यांच्यातर्फे तातडीने कार्यवाही करण्याबाबत शिष्टमंडळामार्फत विनंती करण्यात आली. तसेच संबंधित आरोपीस कठोर शासन करावे जेनेकरुन भविष्यात कुठल्याही विभागतील अधिकारी कर्मचारी यांच्या विरुध्द असा प्रकार होण्यास जरब बसेल अशी भावना या प्रसंगी शिष्टमंडळांनी व्यक्त केली.
शुक्रवारी काढण्यात आलेल्या निषेध मोर्च्यात जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित) संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद थोरवटे, जिल्हा सचिव सिध्दार्थ हत्तीअंबीरे, कार्याध्यक्ष राघवेंद्र मदनुरकर, कोषाध्यक्ष पवन तलवारे, धनंजय गुम्मलवार सहकार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे अध्यक्ष धनंजय वडजे, सचिव हणमंत वाडेकर, एस. एम. घोगरे, बालाजी नागमवाड, अशोक मोकले,पदविधर ग्रामसेवक संघटनेचे कार्याध्यक्ष मधुकर मुंगल, लिपीक वर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन मोरे, अशोक कासराळीकर सचिव, मामुलवार, लेखा संघटनेचे गजानन पेंडकर, महाराष्ट राज्य जिल्हा परिषद सांख्यीकी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष जी. एस. पांडलवाड, कार्याध्यक्ष सुधिर सोनवणे सचिव आडेराव डि.के.सहसचिव योगेश वाघ, महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य सांख्यीकी संघटना गणेश कुंटरवार, जिल्हासचिव शेख बाबु मोलासाब, मोरे चंपतराव, डोणेराव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषि तांत्रिक संघटना अध्यक्ष पी.एम. गायकवाड, सरचिटणीस श्रीधर गडगीळे, मुंजाळ एन. आर. महराष्ट्र जिल्हा परिषद् विस्तार अधिकारी पंचायत संघटना अध्यक्ष प्रदिप सोनटक्के, सचिव जीवन कांबळे, प्रकाश जाधव, उडतेवार यु.डी. तसेच जिल्हा परिषद वाहनचालक संघटना अध्यक्ष गणेश अंबेकर, सचिव किरण वैदय, चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष गोविंद गज्जेवार, शिवानी वैद्य, बिलोली पंचायत समितीतून देशपांडे, लतीफ खान, शेख रब्बानो तसेच इतर सर्व संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.