गटविकास अधिका-यास उपसभापतीकडून मारहाण

Read Time:4 Minute, 41 Second

बिलोली/नांदेड : प्रतिनिधी
शासकीय निवासस्थानी बोलावून बिलोली पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यास उपसभापतीनीं मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली . या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या मारहाणीचा जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने निषेध करित गुरूवारी कामबंद आंदोलन केले.तर उपसभापतींना तात्काळ अटक करावी यासंदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.

बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश वसंतराव नाईक यांना बुधवारी दुपारी पंचायत समितील कर्मचारी मजहर कुरेशी यांनी उपसभापती शंकर यकम बोलावत असल्याचा निरोप दिला. त्यावरून कार्यालयीन काम असेल म्हणून, करीत असलेले काम बाजुला सारून गटविकास अधिकारी प्रकाश नाईक हे कर्मचारी कुरेशी यांच्यासोबत सभापती क्वार्टर येथे गेले. यानंतर तेथे उपसभापती शंकर माधव यंकम हे कुणाला तरी फोनवर बोलत होते. फोनवर बोलणे झाल्यानंरत यंकम यांनी सोबत असलेल्या कर्मचा-यास बाहेर काढून क्वार्टरचे दार आतुन लावुन घेत कर्तव्यावर असलेल्या गट विकास अधिकारी नाईक यास शिवीगाळ करत तुझा फोन का बंद आहे.तु दिवाळीपासुन ऑफीसला का आला नाही असे म्हणून गटविकास अधिकारी नाईक यांच्या अंगावर येत त्यांचे शर्ट पकडुन धक्काबुक्की करत मारहाण केली.

यावेळी तेथे हजर असलेले यंकम यांचे मित्र रामपुरे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे न ऐकता त्यांना मारहाण सुरूच ठेवली.तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उपसभापती शंकर यंकम यांनी कर्तव्यावर असताना गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांना शासकीय कामात अडथळा निर्माण करत मारहाण केल्या प्रकरणी बुधवारी बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गटविकास अधिकारी नाईक यांना झालेल्या मारहाणीचा गुरूवारी जिल्हा परिषदेत कर्मचारी युनियनच्या वतीने निषेध करून कामबंद आंदोलन करण्यात आला. यानंतर कर्मचा-यांनी दिवसभर काळ्याफिती लावुन काम केले. तर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिका-यांना संघटनेच्या वतिने निवेदन देऊन यंकम यांचे सदस्यत्व रदद करावे, तात्काळ अटक करावी व गट विकास अधिकारी यांना पोलिस संरक्षण दयावे अशी मागणी केली आह

े.यंकम यांना अटक न केल्यास आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर गट विकास अधिकारी केशव गडापोड, श्रीकांत बळदे, तुकाराम भालके यांच्यासह युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद थोरवटे, सिध्दार्थ हत्ती अंबीरे, कार्याध्यक्ष राघवेंद्र मदनुरकर, कोषाध्यक्ष पवन तलवारे,धनंजय गुंमलवर,बालाजी ताट्टीपामले, राज्य ग्रामसेवक यूनियनचे धनंजय वडजे, सांख्यीकी कर्मचारी संघटनचे जी.एस.पांडलवाड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत. जिल्हा परिषदेत झालेल्या निषेंध सभेस अति.मुख्य मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबकले, सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य कार्याधयक्ष बाबुराव पुजारवाड, नामदेव केंद्रे यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen + twenty =