गंधर्वनगरीत होळीनिमित्त आज महामूर्ख कवि संमेलन

Read Time:3 Minute, 46 Second

नांदेड : प्रतिनिधी
शृंगारिक कविता व विनोदाची रेलचेल असणारे होळीनिमित्त होणारे विसावे महामूर्ख कवि संमेलन आज दि. १७ मार्च रोजी गंधर्वनगरी, कलामंदिर, येथे सायंकाळी ६ ते १० या दरम्यान फक्त पुरुषांसाठी होणार आहे.रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक अ‍ॅड. दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन बियाणी, डॉ हंसराज वैद्य यांनी दिली आहे.

माणसाचे मन फार विचित्र असते. अनेक भावना त्यांना व्यक्त करता येत नाहीत. त्या भावनांचा निचरा करण्यासाठी पुरातन काळापासून होळीचा सण साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर होलिका उत्सव समिती व कला मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात येणारे नांदेडचे महामूर्ख कवी संमेलन गेल्यावर्षी कोरोनामुळे झाले नसल्याने रसिकांचा हिरमोड झाला होता. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या वर्षी कविसंमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मर्चंट बँक नुतन अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते तर विशेष अतिथी म्हणून भाजपा दिव्यांग आघाडी प्रदेश संयोजक रामदास पाटील सुमठाणकर व उद्योजक अखिलेश गुप्ता हे उपस्थित राहणार आहेत.

भारतातील प्रसिद्ध कवी अनिल आवारा बनारस, शायर रफिक नागरी इंदोर, सरदार सुखप्रीत सिंह भोपाल हे आपल्या द्विआर्थी काव्यप्रतिभेतून होळीचा रंग उधळणार आहेत. याशिवाय वर्षी आपल्या शृंगारिक गीतांनी रसिकांना खिळवून ठेवणारे हास्य सम्राट सिद्धार्थ खिलारे, रमेश गिरी, सतीश कासेवाड, प्रा. रविंद्र अंबेकर, सिनेस्टार लच्छु देशमुख, बजरंग पारीख, पत्रकार राजेंद्र शर्मा, वैजनाथ जाधव, रेशमाजी हिंगोलेसर,संजय व्होरा हिंगोली,सुरेश बामालवा,संजय बोधने, विलास जोगदंड हे आपल्या आगळ्यावेगळ्या प्रतिभेने रसिकांना आनंदात चिंब करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निबंर्धांमुळे कवीसंमेलन बरोबर रात्री दहा वाजता बंद करण्यात येणार आहे.यावेळी भाजपचे प्रवीण साले, विरोधी पक्ष नेते दीपकसिंग रावत, सतीश सुगनचंद शर्मा,गुरुद्वारा बोर्ड सचिव सरदार रविंद्रसिंघ बुंगई, व्यापारी शिवप्रसाद राठी, शिवाजीराव ईबितवार, सन्नी गोयल,लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णाचे अध्यक्ष नागेश शेट्टी, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सचिव अरुणकुमार काबरा जैन समाज जिल्हाध्यक्ष राजू जैन, सुमेर राजपुरोहित हे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 + eleven =