खून करून प्रेत तळ्यात फेकले; बिलोली येथील घटना – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-7 जुलै रोजी रात्री 9 वाजता घरातून गेलेल्या व्यक्तीचे प्रेत बिलोलीच्या न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या तळ्यात सापडल्यानंतर त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धम्मशिला गौतम सोनकांबळे रा.आरळी ता.बिलोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 जुलै रोजी रात्री 9 वाजता त्यांचे पती गौतम यांना बोलावण्यासाठी आरळी येथील मन्मथ मारोती पंदीलवाड हा आला आणि गौतम दादा अरजंट काम आहे माझ्यासोबत चला अर्धा तासात परत येवू असे म्हणाला. आपली दुचाकी गाडी घेवून गौतम सोनकांबळे त्याच्यासोबत गेले. पण ते परत आले नाहित. 8 जुलै रोजी पहाटे 2 वाजेच्यासुमारास त्यांचे गौतम सोनकांबळेचे प्रेत सापडले. त्यानुसार त्यांच्या पत्नी धम्मशिला सोनकांबळे यांनी तक्रार दिली. माझ्या पतीला मन्मथ पंदीलवाड याने अज्ञात कारणासाठी ठार करून त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तळ्यात फेकून दिले आहे.
बिलोली पोलीसांनी या घटनेला भारतीय न्याय संहितेची कलमे 103(1), 238, 3(5) आणि सोबत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे 3(2)(व्ही.ए.), 3 (1)(आर) नुसार गुन्हा क्रमांक 113/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.


Share this article:
Previous Post: मुखेड येथील विरभद्र मंदिराच्या विकासाला आमचा विरोध नाही-विरभद्र स्वामी

July 9, 2024 - In Uncategorized

Next Post: फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे

July 9, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.