खून करणाऱ्या तिघांना चार दिवस पोलीस कोठडी  – VastavNEWSLive.com


 

नांदेड, (प्रतिनिधी)- 13 मे 2024 च्या रात्री वजीराबाद भागातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात एका व्यक्तीचा खून करणाऱ्या तीन जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.बी. भडके यांनी चार दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.

नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यासमोर महानगरपालिकेची पाण्याची टाकी आहे.काल रात्री 13 मे रोजी 11:45 वाजता लक्ष्मण गोविंद पवार (23), दिनेश साईनाथ मेटकर (23), सुनील पिराजी मेटकर (20) या तीन जणांनी संदीप गंगाराम मेटकर (35) यास जुन्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी रोडचा वापर करून जीवे मारून टाकले. संदीप मेटकर चा मित्र रणबिरसिंघ उर्फ सोनू महाराज कोमलसिंघ बुंगई (39) हा व्यक्ती सुद्धा या हल्ल्यात जखमी झालेला आहे. वजीराबाद पोलिसांनी मयत संदीपचे बंधू संजय गंगाराम मेटकर यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 324, 323, 506, 34 नुसार पुन्हा क्रमांक 220 /2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्याकडे देण्यात आला. आज 14 मे रोजी दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे, शेख रब्बानी, व्यंकट गंगुलवाड आणि नागपवाड यांनी पकडलेल्या तीन जणांना न्यायालयात हजर केले. सादरीकरणा नंतर न्या.ए.बी. भडके यांनी लक्ष्मण पवार, दिनेश मेटकर आणि सुनील मेटकर ला चार दिवस अर्थात 18 मे 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

संबंधित बातमी ….

आपल्याच भावकीतील व्यक्तीचा तिन जणांनी केला खून


Post Views: 92


Share this article:
Previous Post: स्ट्रॉंग रूमच्या पाहणीला चार उमेदवारांची उपस्थिती

May 14, 2024 - In Uncategorized

Next Post: अर्धापूर येथील मुलांचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

May 14, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.