
खा. डॉ. अमोल कोल्हे जातायत एकांतवासात ……. सांगीतले हे कारण
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार तथा स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे काहीकाळ एकांतवासात जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर करत त्यांनि एकांतवासात जात असल्याचे सांगीतले आहे.
सिंहावलोकनाची वेळ, गेल्या काही दिवसांत, महिन्यांत आणि वर्षभरात बेभान धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय घेतलेत, अनपेक्षित पावलंही ऊचलली. पण हे सगळं जुळवतांना प्रचंड ओढाताण झाली. तारेवरची कसरत, वेळेची गणित यामध्ये प्रचंड ताणतणाव आला. यादरम्यान शारिरीक आणि मानसिक थकवा आला.
शारीरीक थकवा आरामाने निघुन जाईल, मात्र मानसिक तणाव कमी करण्यासाठी काही काळ शांततेत घालवण्याची गरज आहे. घेतलेल्या काही निर्णयांवर, ऊचललेल्या टोकाच्या पाऊलांवर विचार करण्याची, चिंतन करण्याची गरज आहे. त्यामुळे काहीकाळ एकांतवासात जात असल्याचे अमोल कोल्हेंनी म्हटले आहे.
एकांतवासात जात असल्यामुळे काही काळ संपर्कात राहु शकणार नाही. मात्र लवकरच पुन्हा नव्या जोशाने आणि नव्या जोमाने कामाला लागायचे आहे असेसुद्धा अमोल कोल्हे म्हणालेत.
More Stories
आता शिंदे गटाकडूनच व्हीप
शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यात हजर राहण्यास सांगितले मुंबई : पक्षात फूट पाडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांविरोधात नवा डाव...
सिटी चिटस् च्या वतीने रंगणार उद्या डॉक्टरांचा सन्मान सोहळा
हॉटेल मिडलँड, स्टेडीअम रोड, येथे शनिवार , सायंकाळी ६.०० ,वा, २ जुलै , २०२२ रोजी आयोजन...! नांदेड – बातमीदार नांदेडातील...
अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे संपन्न
इंदापूर : दोन वर्षानंतर प्रथमच झालेल्या या रिंगण सोहळ्यात वारक-यांमध्ये उत्साह दिसून आला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज...
देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात समावेश घेणार नाहीत
मुंबई : शिवसेने एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असून सायंकाळी ७.३० मिनीटांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...
रिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांचा प्रवास
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल...
फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?
मुंबई : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा...