खाद्यतेल ३० रुपयांनी स्वस्त होणार

Read Time:3 Minute, 30 Second

नवी दिल्ली : अनेक तेल उत्पादक कंपन्यांनी जुलैच्या तिस-या आठवड्यात एक लिटरची बाटली आणि पाऊचच्या किंमतीत ३० रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे.

खाद्यतेल लवकरच ३० रुपयांनी स्वस्त होणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने(डीएफपीडी) याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या, जुलैच्या तिस-या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत ३० रुपयांची घट येईल. एवढंच नाही तर सरकार खाद्यतेलावरील सेवा शुल्कात अजून कपात करण्याची ही शक्यता आहे. सरकारने यासाठी कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत खाद्यतेल घरातील किचनमध्ये गोडवा आणेल हे नक्की. एक लिटरची बाटली आणि पाऊच्या किंमतीत ३० रुपयांच्या कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. मध्यंतरी तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घराचे बजेट वाढले होते आणि सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळला होता.

कंपन्यांची दर कपात
अडाणी विल्मर कंपनीने त्यांच्या खाद्यतेल उत्पादनावरील दरात १० ते ३० रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. तर जेमिनी एडिबल अँड फॅट्स कंपनीने ही त्यांच्या उत्पादनावर ८ रुपये ते ३० रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. इमामी अ‍ॅग्री कंपनीने एमआरपीवर ३५ रुपयांपर्यंतची कपात केली आहे. कंपन्यांच्या या कपात धोरणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर दिसून येईल. त्यांना पहिल्यापेक्षा स्वस्त खाद्य तेल खरेदी करता येईल. मदर डेअरीने सुद्धा त्यांच्या खाद्यतेलाच्या किंमती उतरवल्या आहेत. त्यांनी तेलाच्या किंमतीत १५ रुपये प्रति लिटर कपात केली आहे. यामध्ये सोयाबीनचे तेल आणि राईसब्रान तेलाचा समावेश आहे.

बैठकीनंतर तेल कपातीवर तोडगा
सरकारने नुकतीच तेल उत्पादक कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सामान्य जनतेवरील खाद्यतेलामुळे वाढलेला भार कमी करण्यावर जोर देण्यात आला. एवढेच नाही तर कंपन्यांकडून सेवा शुल्काविषयी कंपन्यांकडून सूचना ही मागवण्यात आल्या आहेत. या बैठकीनंतर कंपन्यांनी तातडीने त्यांच्या तेलाच्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 3 =