खरेदी मालाच्या पैशासाठी आडत व्यापा-यांकडून कडकडीत बंद

Read Time:1 Minute, 59 Second

नांदेड: प्रतिनिधी
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतक-यांना वेळेवर मिळत नसल्यामुळे तसेच बाजार समितीच्या एका संचालकाने अपशब्द वारल्यामुळे व्यापा-यांनी सोमवार दि.३ जानेवारी रोजी आपली अडत दुकाने बंद ठेवली होती. मागच्या दिवसापासुन हळदीचे व्यापारी उशिरा पेमेंट देत असल्याने शेतक-यांना व अडत्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.

२४ तासात शेतक-यांना आपल्या मालाचे पैसे मिळाले पाहीजे असा नियम आहे. पंधरा दिवसात एक रूपया कपात करू न व पंचवीस ते तीस दिवसाला काहिही न कपात करता पेमेंट करण्याचा निर्णय अडते खरेदीदार व प्रशासनात झाला होता. परंतु स्थानिक तडजोडीनुसार बाजार समितीत पेमेंट होत नाही. दीड दोन महिन्याला पेमेंट होत असल्याने वाद निर्माण होत आहे. तसेच नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाने अडत्यास अपशब्द वापरल्याने अडत्यात संताप पसरला होता. त्यामुळे या कारणास्तव सोमवार दि. ३ जानेवारी रोजी अडत असोशियशनच्या वतीने बाजार समितीतील बीट, काटे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी नवा मोंढ्यातील सर्व अडत दुकाने बंद ठेवुन अडत्यांनी याचा निषेध व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 5 =