July 1, 2022

कोव्हॅक्सिन संबंधित आणखी माहिती द्या

Read Time:3 Minute, 21 Second

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) आपतकालीन वापरासाठी मंजूरी दिलेली नाही. कोव्हॅक्सिनच्या मंजूरीसाठी भारत वाट पाहत आहे. मात्र भारत बायोटेककडून देण्यात आलेल्या डेटावर जागतिक आरोग्य संघटनेकडून अभ्यास करण्यात आला आणि डब्ल्यूएचओने भारताला मोठा झटका दिला आहे.

कोव्हॅक्सिन लसी संदर्भात भारत बायोटेकने आणथी माहिती द्यावी असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. बुधवारी डब्ल्यूएचओने दिलेल्या एका स्पष्टीकरणात एआयपीएसएनने कोव्हॅक्सिन लसीच्या परीक्षणासाठी आलेला डेटाचा उल्लेख करत म्हटले की, डब्ल्यूएचओकडे आलेल्या सदोष अर्जामुळे भारताच्या प्रतिष्ठेचे मोठे नुकसान झाले आहे. ज्याने भारतीय विज्ञान आणि वियमक प्रणालींची स्थिती बदनाम केली आहे. ज्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्थरावर तपासणी आणि संशोधनावर आले आहे.

कोव्हॅक्सिन लसीवरुन अनेक वाद समोर आले होते. एआयपीएसएनच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिक आणि इतर लोकांनी टीका केल्यानंतरही भारत बायोटेक एक पूर्व प्रकाशन पत्र पोस्ट करणे बाकी आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या क्लिनिकल चाचणी निकालांचे आचरण आणि विश्लेषण करण्यासाठी वैज्ञानिकांच्या नियमांचे पालन करणे, त्याचप्रमाणे पूर्व प्रकाशन पत्र पोस्ट करणे आणि पूर्ण पारदर्शकता ठेवणे महत्त्वाचे असल्याचे कंपनीला सांगण्यात आले आहे.

डब्ल्यूएचओची अद्यापही मान्यता नाही
कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायल्स रिपोर्ट येण्याआधीच लसीला आपतकालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर लस कोरोना विरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे समोर आले. मात्र डब्ल्यूएचओकडून अद्याप कोव्हॅक्सिन लसीला मंजूरी देण्यात आली नाही.

विस्तृत माहिती जारी करणे गरजेचे
क्लिनिकल ट्रायलमध्ये रिजेक्ट केलेल्या अपु-या डेटासह त्याचप्रमाणे पाठींबा देणारे सरकार मागे पडले आणि त्यानंतर ईयूएचे अनुदान मिळाले. तिस-या स्थरातील ट्रायलसाठी अधिक विस्तृत माहिती जारी करणे गरजेचे होते. मात्र दोन महिन्यांनी अंतरिम निकाल आणि जून २०२१मध्ये पूर्ण परीक्षण डेटा जारी करण्यात आला,असे एआयपीएसएनकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 5 =

Close