कोव्हॅक्सिनचा एक डोसदेखील प्रभावी

Read Time:2 Minute, 30 Second

कोरोनाची सामना करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही भारतात राबली जात आहे. जवळपास ५४ कोटींपेक्षा जास्त लोक लसवंत झाले आहेत. सध्या देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. पंरतु लस घेतल्यानंतर अँडीबॉडी कितपत प्रभावी होत आहे यावर भाष्य करणारा एक अहवाल आयसीएमआरने प्रसिद्ध केला आहे.

कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तींनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतर ज्याप्रमाणात अँटीबॉडी तयार होतात, त्याप्रमाणात कोव्हॅक्सिन लसीचा एक डोस घेतलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अँटीबॉडी आढळून येतात, असं आयसीएमआरच्या एका अभ्यासात दिसून आले आहे. आयसीएमआरचा हा अभ्यास निवारी इंडियन जर्नल मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

एसआरएस- कोविड-२ ची लागण झालेल्या लोकांना बीबीवी १५२ लसीचा एकच डोस दिला जाऊ शकतो. जेणेकरून मर्यादित लस साठ्यामध्येही जास्त लोकांचे लसीकरण केले जाऊ शकेल, असेही या अहवालात म्हटले आहे. कोव्हॅक्सिनचे बीबीवी १५२ असे कोडनेम आहे. ही भारतातील पहिली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस आहे. जानेवारीत या लसीला आपातकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजूरी दिली होती.

दरम्यान, ४ ते ६ आठवड्यांच्या फरकाने लसीचे दोन डोस दिले जातात. सध्या देशभरात लसीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. पण अद्याप काही ठिकाणी लसीकरण मोहिम मंदावल्याचे दिसत आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया आणखी वेगवान होण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × one =