कोविड लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी आता घरोघरी

Read Time:2 Minute, 5 Second

नांदेड दि.२१ -कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सिडको आरोग्य केंद्राचे पथकाने आता घरोघरी लसीकरण या मोहिमेस सुरुवात केली असून लसीकरणापासून वंचित असलेल्यांना थेट त्यांच्या घरी जाऊन लसीकरण  व लसीकरणाबाबत नागरिकांचे प्रबोधन या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार असल्याचे सिडको मात्र सेवा केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अब्दुल हमीद यांनी मोहिमेची सुरुवात करताना सांगितले.

ओल्ड प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण लक्षणीय असली तरीही अजूनही नागरिकात लसीकरणाबाबत अनामिक भीती आहे त्यासाठीचे प्रबोधन आणि राहीलेल्यांचे लसीकरण प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन करण्यात येणार असून आज पहिल्याच दिवशी एक हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आज पहिल्याच दिवशी सिडको-हडको भागात लसीकरणापासून वंचित नागरिक शोधून काढत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी कामाला लागले आहेत. या आरोग्य पथकात मिनाक्षी शिंदे,वैशाली वाघमारे,जयश्री दरेगावे राजेश्वरी करडखेले, आशा वर्कर शितल लोखंडे,सावित्रा कोतापल्ले,ईल्यास शेख,केंद्रे सर शेवंता सोनसोळे पुष्पा डोंगरे घाटे गंगा वसिम अ. खयुम, विकास कांबळे अणुसया तेलंग,सुरेखा सातव  शिला सोनकांबळे नसरिन पिंजारी आरोग्यसेविका  मनिषा एडके आदींचा सहभाग आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 4 =