कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा तीन मिनिटांमध्ये निकालात

Read Time:1 Minute, 39 Second

कोल्हापूर : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. गेल्या ५० वर्षांपासून कोल्हापूरची इंचभरही हद्दवाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर हद्दवाढीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्याय सांगितला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीवर भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हद्दवाढीचा निर्णय पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पटवून सांगितले, तर हा निर्णय ३ मिनिटांत संपून जाईल. शहरातील नेते आणि ग्रामीण भागातील नागरिक यांनी हातात हात घालून चालले पाहिजे. जर ग्रामीण भागातील नागरिकांना न समजवता निर्णय घेतला तर यादवी होईल, वाद निर्माण होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शाहू मिलच्या विकासासाठी प्रयत्न करणार
दरम्यान, रखडलेल्या शाहू स्मारकावर बोलताना सांगितले की, हेरिटेज जागेवर स्मारक करू आणि उरलेल्या जागेवर एखादी कंपनी सुरू करता येईल. नागरिकांच्या हाताला काम देणं हे शाहू महाराज यांची भूमिका होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − seven =