कोल्हापूर पोलीस पथकाच्या ताब्यातील मकोकाचा पळून गेलेला आरोपी नांदेड जिल्हा पोलीस मित्रांनी काही तासातच पकडला


नांदेड,(प्रतिनिधी)-कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळून गेलेला मकोका प्रकरणातील एक गुन्हेगार पोलीस मित्रांनी काही तासातच पकडून परत पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

कोल्हापूर येथील पोलीस पथक मकोका प्रकरणातील 4 आरोपी घेऊन कोल्हापूर ते चंद्रपूर असा प्रवास करत असताना सोनखेड जवळ बराच रस्ता एक मार्गी आहे. त्यामुळे या रस्त्यावर गाडी सामान्य वेगापेक्षा अत्यंत कमी वेगात चालवावी लागते,आणि याचा फायदा घेऊन त्या चार आरोपींमध्ये एक विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर हा दरवाजा उघडून चालत्या गाडीतून पळून गेला होता. हा घटनाक्रम आज सकाळी 3 ते 4 वाजेदरम्यान घडला. घटनेची माहिती मिळतात नांदेड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि पोलिसांना तसेच सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी याबद्दल खूप मेहनत घेतली. मडकी कलंबर शिवारात मडकी येथील सरपंचांना या आरोपी बद्दल माहिती मिळाली. त्यांनी त्याला गोड गोड बोलत आपल्याच आखाड्यावर बसून ठेवले आणि याची माहिती पोलिसांना दिली जलद प्रभावाने पोलीस तेथे पोहोचले आणि पळून गेलेल्या विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर यास ताब्यात घेतले आहे.वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू होती. पण काही तासातच मकोका सारख्या गुन्ह्यातील पळून गेलेला आरोपी पकडण्यात नांदेड पोलिसांना पोलीस मित्रांमुळे काही तासातच यश आले.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आरोपीला पकडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पोलीस मित्रांचे आणि पोलिसांचे कौतुक केले आहे. नागरिक सुद्धा बिना गणवेशाचे पोलिसास आहेत त्यांनी मदत केल्याशिवाय पोलीस दल आपले काम योग्य रीतीने पूर्ण करू शकत नाहीत याचा प्रत्यय या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.


Post Views: 141


Share this article:
Previous Post: राज्यभरात 148 जिल्हा न्यायाधीश, 192 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि 313 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या बदल्या; नांदेडचे एस.ई.बांगर मुंबईला

April 7, 2024 - In Uncategorized

Next Post: जिल्हा शल्य चिकित्सक यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट उप जिल्हा रुग्णालय बांधकाम पाहणी

April 8, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.