August 19, 2022

कोरोना लसीमुळे तब्बल २१ आजारांपासून संरक्षण

Read Time:3 Minute, 4 Second

जीनिव्हा : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. लाखो लोकांचे जीव घेतले. आता सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परिणामी ओमिक्रॉनच्या लाटेत संसर्गाचे प्रमाण अधिक असले तरी मृतांचे प्रमाण कमी आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीकरणाबाबत आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना लसींमुळे केवळ कोविड-१९ वरच नाही तर तब्बल २१ आजारांपासून संरक्षण मिळते, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. तसेच व्हॅक्सिन्स वर्क या हॅशटॅगसह सोशल मीडियावर मोहीमही चालवली आहे.

कोरोना लसीकरणामुळे कोरोनामुळे होणा-या मृत्यूची शक्यता नगण्य राहिली आहे. अनेक देशात हे सिद्ध झाले आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी कोरोना लसीविषयी गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. परिणामी कोरोना लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ही मोहीम जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केली आहे, असे सांगण्यात येत आहे. व्हॅक्सिन्स वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लस घेतल्यामुळे संरक्षण होणा-या २० पेक्षा अधिक आजारांची यादीच जाहीर केली आहे. तसेच सर्वांनी वेळेवर कोरोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचा-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना लसीमुळे संरक्षण होणारे आजार
गर्भाशयाचा कर्करोग, कॉलरा, घटसर्प, इबोला, हेपॅटिटीस बी, इन्फ्लुएंझा, जपानी एन्सेफलायटीस, गोवर, मेंदुज्वर, गालगुंड, डांग्या खोकला,न्यूमोनिया, पोलिओ, रेबिज, रोटा व्हायरस, धनुर्वात, विषमज्वर, कांजण्या, पीतज्वर

मुलांना लस देण्यास उशीर नको
मुले कोरोना काळातदेखील वाढत असतात. त्यामुळे या काळात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढायला हवी. कोरोना लस सर्व वयोगटातील व्यक्तींना संरक्षण देते. मुलांना आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी लस देणे हा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक पर्याय आहे. त्यामुळे लस घेण्यास उशीर करू नका, आजच आपली लस घ्या, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या ट्वीटमध्ये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 + twelve =

Close