August 9, 2022

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध होणार शिथिल

Read Time:1 Minute, 34 Second

महिना दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पुर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आत्ता मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.

दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

कोरोना प्रतिबंधक लस गतीने उपलब्ध व्हायला हवी, केंद्राने जर राज्याला लीसीचा पुरवठा केला तर लोकलबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही टोपे यावेळी बोलताना म्हणाले.

ICMR ने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. ICMR सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांना आम्हाला सांगाने प्रोटोकॉल द्यावे. कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल या संदर्भात सुचना द्याव्या. असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

seven − 3 =

Close