कोरोना आटोक्यात ; व्यवसायिकांवर लागू केलेले निर्बंध हटविण्यात यावेत

Read Time:2 Minute, 45 Second

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील कोरोना विषाणूची साथ आटोक्यात आली असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसायीकावर लागू केलेले निर्बंध सणासुदीमुळे हटविण्यात यावेत अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असून जिल्हाधिकारी यांनी मागणीस अनुकूलता दर्शविली असून प्रशासनास सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आ.बबनराव शिंदे यांनी याबाबत सांगितले की,मी आजच जिल्हाधिकारी डॉ.मिंिलद शंभरकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असून माढा तालुक्यातील कोरोना साथ आटोक्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांना खरेदी करण्यासाठी लागू केलेले निर्बंध तातडीने हटवावेत असे सांगितले आहे.या मागणी विषयी जिल्हाधिकारी डॉ.मिंिलद शंभरकर यांनी अनुकूलता दर्शविली असून या संदर्भात प्रशासनास सूचना करण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून कोरोना साथीच्या रोगामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढल्याने करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर व सांगोला येथे सकाळी ०७ वा. ते दुपारी ०४ वा.पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिलेली होती.या निर्बंधांमुळे शेतकरी,व्यापारी यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याने जिल्हाधिकारी डॉ.मिंिलद शंभरकर यांनी निर्बंध हटविण्याचे संकेत दिले आहेत.यामुळे आता लवकरच कोरोना साठीचे निर्बंध हटविण्यात येथील अशी माहिती आ.शिंदे यांनी दिली आहे.तसेच सर्व नागरिकांनी कोरोना साथरोग नियमाचे पालन करून आपापली खरेदी केली पाहिजे असे ही आ.बबनराव शिंदे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − ten =