August 19, 2022

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी १ लस !

Read Time:2 Minute, 44 Second

वॉशिंग्टन : जगभरात वर्षभरापेक्षा जास्त काळापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या महामारीमुळे जगभरात लाखो लोकांना जीव गमावावा लागला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या महामारीला रोखण्यासाठी जास्तीत जास्त परिणामकारक ठरणा-या लस निर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लस निर्मिती करणारी कंपनी नोवाव्हॅक्सने त्यांची लस कोरोनाच्या व्हेरिएंट विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्या अंतर्गत २०० कोटी लस निर्मिती केली जाणार होती. लस कोरोनाविरोधात ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले, असे कंपनीने म्हटले आहे. प्रारंभीच्या आकडेवारीनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही समोर आले आहे. सध्या कोरोना लसीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशावेळी नोवाव्हॅक्सच्या लसीबाबत ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे वेगाने लस उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत मंजुरीबाबत प्रयत्न
अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असल्याने, तिथे लस तुटवडा जाणवत आहे. नोवाव्हॅक्स लशीला साठवण आणि वाहतूक करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यात ही लस मोठे योगदान देण्याची शक्यता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत अमेरिका-युरोप व अन्य ठिकाणी लसीकरणासाठी या लसीला मंजुरी मिळावी या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणि तोपर्यंत एका महिन्यात १० कोटी लस निर्मिती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty − seven =

Close