कोरोनामुळे शाळा पुन्हा ऑनलाईनवर

Read Time:2 Minute, 51 Second

गेल्या तीन-चार महिण्यापासून जिल्हयातील शाळांनी ऑफलाईन शिकवणीला सुरूवात केली होती. डिसेंबर अखेर व जानेवारी महिण्याच्या पहिल्या आठवडयात कोरोना रूग्ण संख्या वाढीचा वेग पहाता पुन्हा इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन ऑफलाईन शिक्षण दि. १० जानेवारी पासून ऑनलाईन सुरू करण्याच्या सुचना शासन स्तरावरून आल्याने शाळानीही आता मंगळवार पासून ऑनलाईन शिकवणीची तयारी सुरू केली आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाची पहिली लाट आली आणि संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे शाळाही बंद झाल्या. एप्रिल २०२१ मध्ये परत कोरोनाची दुसरी लाट आली त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. गेल्यावर्षी कोरोनाचा घटता प्रभाव पहाता शिक्षण विभागाने दि. १५ जून पासून ऑनलाईन शाळा सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. ब-याच शाळांनी इयत्ता १ ली ते १२ वी चे ऑनलाईन वर्ग सुरू केले. कोरोनाचा घटता दर पहाता शिक्षण विभागाने पालकांची मंजूरी घेवूनच ग्रामीण भागात दि. १५ जुलै पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या संदर्भाने गावामध्ये पालकांच्या बैठका होऊन दि. १५ जुलै पासून इयत्ता ८ वी ते १२ वी वर्गचे सुरू झाले.

शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात इयत्ता ५ ते १२ पर्यंतचे तर शहरी भागात ८ वी ते १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू
झाल्यानंतर बुधवार दि. २० ऑक्टोबर पासून विद्यापिठातंर्गत असलेली महाविद्यालये सुरू झाली होती. गेल्या दोन महिण्यापासून विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाची गोडी लागत असतानाच डिसेंबर अखेर कोरोनाची रूग्ण संख्या वाढल्याने सर्व शाळा १० जानेवारी पासून ऑनलाईन सुरू करण्याच्या सुचना शिक्षण विभागाला मिळाल्या. त्यामुळे जिल्हयात पुन्हा ऑनलाईन वर्ग सुरू होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + ten =