कोरोनामुक्तीच्या कामासाठी सिकंदरपूरच्या सरपंचाचे कौतुक; मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

लातूर : तालुक्यातील सिकंदरपूर येथील सरपंच रेश्मा माधव गंभीरे यांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन सरपंच रेश्मा गंभीरे यांनी कोरोना रुग्णांची माहिती तात्काळ होण्यासाठी गावात सुरु केलेल्या व्हॉटस्अ‍ॅप गु्रपचे विशेष कौतूक करुन राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी असा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. आलमलाचे सरपंच कैलास निलंगेकर, सरवडीचे सरपंच बालाजी मोहिते हेही यावेळी उपस्थित होते.

सिकंदरपुरच्या सरपंच गंभीरे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी गावामध्ये माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली. गावातील आशा कार्यकर्त्या व आँटी कोरोना फोर्सचे सदस्य यांना सोबत घेऊन गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधाच्या उपाय योजनांची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले. त्याप्रमाणेच माझे गाव माझी जिम्मेदारी ी मोहीम गावात राबवून गावातील निराधार अपंग विधवा लाभाथ्र्­यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्याने त्यांचे अनुदान त्यांना घरपोच वाटप करण्यात आले त्यामुळे गर्दी टाळण्यात यश मिळून संसर्ग होण्याचा अटकाव करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.

सिकंदरपुर गावात एकाही व्यक्तीला कोरोना होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जरी कोरोना झाला तरी कोरोना रुग्णांची माहिती तात्काळ मिळावी यासाठी गावातील सर्व महिला व पुरुष यांचे स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले व या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या तसेच शेजारच्या कुटुंबात कोठेही संशयित रुग्ण आढळल्यास त्याची तात्काळ माहिती द्यावी असे कळविण्यात आले. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ संबंधित रुग्णावर योग्य ते उपचार करुन त्यांना अलगीकरण ठेवण्यात आले या व्हाट्सअप ग्रुप मुळे कोरोना रुग्णांची तात्काळ माहिती मिळत असल्याने व त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या मार्फत तात्काळ उपचार करणे शक्य झाल्यामुळे आज गाव पूर्णपणे कोरोना मुक्त झाल्याची माहिती सरपंच रेश्मा गंभीरे यांनी मुख्यमंत्री यांना दिली.

गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून गाव व गावातील रस्ते पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात आले. गावात सोडियम हैपो क्लोराईडच्या फवारण्या करण्यात आल्या तसेच सर्व कुटुंबांना मास्क व सानीटायझर वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले असेही रेश्मा गंभीरे यांनी सांगितले. गावाची लोकसंख्या १ हजार ८३६ इतकी असून ४५ वर्षावरील ४१६ नागरिक आहेत. गावातील ९५ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आलेले असून सुरुवातीच्या काळात लसीकरणाला गावातून प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे माझी सासू सासरे हे वयस्कर असून त्यांना बीपी व शुगर चा त्रास आहे तर प्रथम त्यांना लस देण्यात येऊन सर्व गावासमोर त्यांचा आदर्श ठेवून बस आरक्षण सुरक्षित असून प्रत्येकाने लशी करून घ्यावे असे सांगण्यात आले त्यामुळे आज जवळपास ४५ टक्के लसीकरण
झालेले आहे असे माहिती रेश्मा गंभीरे यांनी दिली.

सर्वांना शुद्ध व नैसर्गिक ऑक्सिजन चा पुरवठा व्हावा यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावातील प्रत्येकाच्या घरी ग्रामपंचायतच्या वतीने एक वृक्ष देऊन त्या वृक्षाचे संगोपन करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे सिकंदरपुर गाव कोरणा मुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद पंचायत समिती लातूर व आरोग्य विभाग यांनी वेळोवेळी सहकार्य केले त्याबद्दल रेश्मा गंभीर यांनी आभार व्यक्त केले तसेच गावच्या सरपंचांना थेट मुख्यमंत्री महोदय यांची बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. व कोरोना मुक्तीच्या चळवळीत सिकंदरपुर गाव सक्रिय सहभाग घेईल, अशी ग्वाही सरपंच गंभीरे यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत उदयसिंह साळुंके यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 10 =

vip porn full hard cum old indain sex hot