
कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही
नवी दिल्ली : देशात येणा-या कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तिस-या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. तसेच, जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
तज्ज्ञ आणि सरकारकडून तिस-या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या दुसरी लाटेतील रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत आहे. त्यामुळे ही लाट नियंत्रणात येत आहे, असे डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. तसेच, जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुस-या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल, असे म्हटले जात आहे. याशिवाय, काल कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही. मात्र येणा-या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मुलांचा विचार करू इंफ्रास्ट्रच्कर तयार करणे गरजेचे आहे.