January 25, 2022

कोरोनाची साथ सर्दी-पडशापुरतीच!

Read Time:3 Minute, 36 Second

लंडन : कोविड-१९ या साथीच्या आजारापासून अजून जगाची सुटका झालेली नाही. अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. भारतातदेखील कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. लहान मुलांनाही लस देण्याची तयारी जोरात सुरू आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचे अखेरच्या टप्प्यात सामान्य सर्दीसारखे सौम्य रुपांतर होईल. या महासाथीचा शेवट सर्वसामान्य सर्दी-खोकल्याच्या आजाराप्रमाणे होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रा. डेम सारा गिलबर्ट आणि सर जॉन बेल यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसचे अजून धोकादायक व्हेरिएंट आता येण्याची शक्यता कमीच आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतले मेडिसीन विषयाचे प्राध्यापक सर जॉन बेल यांच्या म्हणण्यानुसार या विषाणूचा प्रभाव फेब्रुवारी-मार्चपर्यंत सामान्य सर्दी-खोकल्यासारखा होऊन जाईल. कारण लोकांची इम्युनिटी लसीकरण आणि विषाणूशी सामना करताना मोठ्या प्रमाणावर वाढलेली असेल. जॉन बेल यांच्या म्हणण्यानुसार यूकेमधली स्थिती अधिक वाईट आहे. मात्र, हिवाळा संपल्यानंतर ती सुधारेल, असे वाटते. लोकांनी लस घेतल्यानंतरही त्यांना विषाणूशी सामना करावा लागत आहे. मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेन्सेल यांनीदेखील जागतिक पातळीवर लशींचा पुरवठा वाढत असल्याने कोरोना महासाथ आता एका वर्षाच्या आत संपुष्टात येईल, असे म्हटले आहे.

प्रा. गिल्बर्ट यांनी विषाणू जसजसा पसरत आहे, तसतसा तो कमजोर होत आहे, असे म्हटले. यावर भाष्य करताना सर जॉन यांनी ज्या प्रकारचा ट्रेंड दिसत आहे, त्यानुसार पुढील सहा महिन्यांत आपण चांगल्या स्थितीत पोहोचू शकतो. त्यामुळे ताण कमी होत आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे; मात्र हे मृत्यू निश्चितपणे कोरोनामुळेच झाले याबाबत अद्याप स्पष्टता नाही, असे म्हटले आहे.

मजबूत हर्ड इम्युनिटीची आशा
सर जॉन यांनी डेल्टा व्हॅरिएंटलाही खूप एक्सपोजर मिळाला आहे. संसर्गाची संख्या खूप जास्त आहे. परंतु ज्या लोकांना लशींचे दोन डोस मिळाले आहेत आणि ज्यांना संसर्ग झाला आहे, अशा लोकांची वाटचाल हर्ड इम्युनिटीच्या दिशेने होईल. त्यामुळे वाईट काळ आता ब-यापैकी संपुष्टात आला आहे, असे मला वाटते, असे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 14 =

Close