कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य

 दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोना विषाणू संक्रमणाची तिसरी लाट देशात दाखल होऊ शकते. ही तिसरी लाट रोखणे अशक्य असल्याचे मत ऑल इंडिया इंस्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही, कारण यामुळे जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो, असंही मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

आत्तापर्यंत देशातील ५ टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. या वर्षीच्या शेवटपर्यंत देशातील १०८ कोटी लोकसंख्येचे लसीकरण करणे, हे सरकारचे लक्ष्य आहे आणि हे एक मोठे आव्हान आहे. कोरोना संक्रमणाच्या दुस-या लाटेत मार्च महिन्याच्या शेटी सुरु झालेले लॉकडाऊनचा सिलसिला देशभरात आता कुठे हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यातच तज्ज्ञांकडून तिस-या कोरोना संक्रमणाच्या लाटेच्या शक्यतेवर सावधानतेचा इशारा दिला जात आहे़ देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, कोविड नियमांसंबंधी ढिलाई दिसून येत आहे. आपण कोविडच्या पहिल्या आणि दुस-या लाटेतून काहीही धडा घेतल्याचे सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत नाही. पुन्हा एकदा गर्दी दिसून येत आहे. अनेक लोक एकत्र येत आहेत.

सहा ते आठ आठवड्यांत तिसरी लाट?
येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. किंवा त्यापेक्षा थोडा अधिकही वेळ लागू शकतो. कोविड नियम आपण कशा पद्धतीने हाताळतो आणि गर्दीपासून वाचण्याचा कसा प्रयत्न करतो, त्यावर हे अवलंबून आहे, असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे़

तिस-या लाटेत संख्या कमी असल्याची शक्यता
देशात ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. या सर्व्हेत जगभरातील ४० तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, पिडेमिओलॉजिस्ट आणि प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला होता. जास्तीत जास्त लोकांना लसीकरणात सहभागी करून कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते, असे मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुस-या लाटेच्या तुलनेत तिस-या लाटेत संक्रमणाची संख्या कमी असू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 2 =

vip porn full hard cum old indain sex hot