
कोरेगाव भीमा : शौर्य दिनानिमित्त अभिवादन
लातूर : प्रतिनिधी
अस्पृश्यताविरोधात स्वत:च्या अस्मितेसाठी व समानतेच्या हक्कासाठी लढल्या गेलेल्या कोरेगावा भीमाच्या लढाईला ऐतिहासिक महत्त्व आहे. या लढाईत आत्मसन्मानासाठी प्राणपणाने लढलेल्या शहीद वीरांना २०५ वा कोरेगाव भीमा विजय दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवनाथ आल्टे, सचिन गंगावणे, दिलीप गायकवाड, पप्पू सरवदे, लाला सुरवसे, विनयजी जाकते, अॅड. निशांत वाघमारे, शरद ढगे, महेंद्र कांबळे, डी. उमाकांत, अतिष काळे, आकाश इंगळे इत्यादी उपस्थित होते.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने कोरेगांव भीमा शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रविण कांबळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, संजय सुरवसे, अशोक सूर्यवंशी, शिवाजी सिरसाठ, राजाभाऊ गायकवाड, इलाही तांबोळी, श्रीमती यादव, करण गायकवाड, जी. एस. गायकवाड, किशोर मोरे, हरीश वाघमारे, लतेश आवटे, हणमंत मादळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.