
“कोपर्डीच्या त्या भगीनीला सहा महिन्यात न्याय मिळाल पाहिजे” संभाजीराजेंची मागणी
छत्रपती संभाजीराजे यांनी कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेतील पिडितेच्या घरी भेट दिली. कोपर्डीतील या भगिनीला लवकरांत लवकर न्याय मिळावा, सहा महिन्यात हे प्रकरण निकाली काढावे असे छ. संभाजीराजेंनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बातचीत करणार असल्येचेसुद्धा त्यांनी यावेळी सांगीतले.
२०१७ मध्ये मानवतेला काळीमा फासणारी ही घटना घडली. तेव्हा आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली होती. आरोपींनी याप्रकरणी ऊच्च न्यायलयात धाव घेतली. एका कायद्याचा संदर्भ देत संभाजीराजे म्हणाले आरोपींस दोन वर्षापर्यंत ऊच्च न्यायालयात अपील करण्यास मुभा असते.
त्यानुसार कोपर्डी सामुहीक बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपीने २०१९ मध्ये ऊच्च न्यायलयात अपील केली. मात्र २०१९-२० हे वर्ष निघून जात आता २०२१ आहे. तरिसुद्धा ही केस प्रलंबित आहे. त्यामुळे या केसचा लवकरांत लवकर निकाल लावाला अशी मागणी छ. संभाजीराजे यांनी यावेळी केली.
समाजाला आणि आमच्या भगिनीला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. त्यामुळे आज मी कोपर्डीतील निर्भयाच्या कुटुंबियांची भेट घेतली. येथून परत गेल्यानंतर लगेचच मी मुख्यमंत्र्यांना याप्रकरणाची आठवन करुन देईल व विशेष खंडपीठ स्थापन करुन सहा महिन्यातं निकाल लावण्याची मागणी करणार आहे.