कोथरूड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार

Read Time:1 Minute, 28 Second

पुणे : कोथरूड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. येथे काम करणा-या एकाच्या दंडाला गोळी चाटून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजयकुमार (वय २५, रा. बिहार) असे जखमी झालेल्या कर्मचा-याचे नाव आहे. ही घटना कोथरूडमधील कारशेडमध्ये बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या कर्मचा-यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो कारशेडच्या उभारणीचे काम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी दोन कामगार वेल्डिंगचे काम करत होते. यावेळी वेल्डिंगचे काम करत असताना कामगाराच्या दंडाला गोळी चाटून गेली. त्यावेळी तेथे काही काडतुसे सापडल्याचे मेट्रोच्या कर्मचा-यांनी सांगितले असून ही काडतुसे कोथरूड पोलिसांच्या हवाली करण्यात आली आहेत. ही काडतुसे येथे कशी आली, याचा तपास कोथरूड पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 − 7 =