August 19, 2022

कोणाचीही नोकरी जाणार नाही

Read Time:4 Minute, 39 Second

मुंबई : संपकरी एसटी कर्मचा-यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ््या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचा-यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी आज दोन्ही सभागृहात केले. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामांवर आल्यानंतर कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचा-यांचा संप सुरू आहे. अजूनही हे कर्मचारी या मागणीवर ठाम आहेत. यासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले. परंतु कर्मचा-यांनी संप सुरूच ठेवला. राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेल्यापासून राज्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारकडून एसटी कर्मचा-यांना कामावर रूजू होण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु अद्यापही राज्याच्या काही भागातील एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत.

एसटी कर्मचा-यांच्या संपावर बोलताना अनिल परब म्हणाले की, संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. तसेच कामगारांनी येत्या ३१ मार्चपर्यंत कामगार रुजू व्हावे. याचबरोबर आत्महत्या करणा-या कुटुंबांना सहानुभूती देत कुटुंबातील व्यक्तीला कामावर घेतले. कामगारांवरच्या सगळ््या कारवाया आम्ही आताही मागे घेत आहोत. एसटीचा किमान पगार २५ हजार तर, कमाल पगार ६० हजारांपर्यंत आहे. भाजी विकण्याचे कारण काय, एसटीत येऊन काम करा. इतर मागण्यांवर चर्चा करत मान्य करण्यासाठी तयार आहोत, असेही अनिल परब म्हणाले. दरम्यान, परीक्षार्थ्यांसाठी ज्यादा गाड्या सोडण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

इतर मागण्यांवर चर्चा करण्यास तयार
एसटी कर्मचा-यांना आधीच आर्थिक वाढ दिलेली आहे. आंदोलनादरम्यान आत्महत्या करणा-या कुटुंबातील व्यक्तीला कामावर घेतले आहे. सोबतच कारवायाही मागे घेत आहोत. इतर मागण्यांवर चर्चा करण्यास तयारही आहोत, असेही अनिल परब म्हणाले.

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तफावत नाही
एसटीचा किमान पगार २५ हजार तर, कमाल पगार ६० हजारांपर्यंत आहे. इतर मागण्यांवरही चर्चा करत मान्य करण्यास तयार आहोत. मात्र, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तफावत देण्याचे मी मान्य केले नाही, असेही परबांनी सांगितले.

अन्यथा कठोर निर्णय : उपमुख्यमंत्री
संपात सहभागी कर्मचा-यांंनी ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे. तसे न झाल्­यास कठोर निर्णय घ्­यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. भविष्­यात जे कर्मचारी संपात कायम राहतील, त्­यांना त्­या रजा मंजूर होणार नाहीत किंवा संपकाळातला पगारही मिळणार नाही. संप कायम राहिल्­यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सर्व प्रमुख नेत्­यांची बैठक घेण्यात येईल व निर्णय होईल, असेही अजित पवार म्­हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + seven =

Close