कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही; आरोप भूल करणारे

Read Time:2 Minute, 6 Second

मुंबई : कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्याची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे, असा दावा गृहखात्याने केला आहे.

राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली असा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे केला होता. परंतु गृहखात्याने एकनाथ शिंदे यांचे आरोप फेटाळले आहेत.

गृह विभागाने याबाबत ट्विट करून माहिती दिली. ‘राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे सध्या बंडखोर आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. इथल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांचा मुक्काम आहे.

एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आरोप
राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढून घेतले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून हा आरोप केला. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seven + eighteen =