August 9, 2022

कोकणावर अतिवृष्टीचे संकट कायम: खेड पोसरे या भागातही कोसळली दरड

Read Time:2 Minute, 29 Second

सध्या कोकणात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होत आहे. त्यात अजून एक भर म्हणून खेड पोसरे या भागात दरड कोसळली आहे. या दरडेखाली १७ जणांचा मृत्यदेह निघाले आहेत. अजूनही इथे शोध कार्य सुरुच आहे. या घटनेत सात जण जखमी झाले, त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. याबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाने माहिती दिली आहे. त्यानुसार या दुर्घटनेत रंजना रघुनाथ जाधव, रघुनाथ जाधव, विकास विष्णु मोहिते, संगिता विष्णु मोहिते, सुनिल धोंडीराम मोहिते, सुनिता धोंडीराम मोहिते, आदेश सुनिल मोहिते, काजेल सुनिल मोहिते, सुप्रिया सुदेश मोहिते, विहान सुदेश मोहिते, धोडीराम देवू मोहिते, सविता धोडीराम मोहिते, वसंत धोडीराम मोहिते, वैशाली वंसत मोहिते, प्रिती वसंत मोहिते, सचिन अनिल मोहिते, सुमित्रा धोडू म्हापदी यांचा समावेश आहे.

तर या दुर्घटनेत जखमी झालेल्यामध्ये अनिल रघुनाथ मोहिते, वसंती रघुनाथ मोहिते, प्रिती सचिन मोहिते, सुरेश अनिल मोहिते, सनी अनिल मोहिते, सुजेल वसंत मोहिते, विराज सचिन मोहिते हे लोक आहेत.

यामुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील वाहतूक थांबवली आहे. या भागात पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक बंद केली आहे. ही वाहतूक सुरु होण्यास सुमारे दोन दिवस लागतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घाटात दरड कोसळून रस्ता खचला आहे, त्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत माती व दगड रस्त्यावर आले आहेत. बांधकाम विभागाकडून ही वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

15 − 1 =

Close