कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांचं निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Read Time:3 Minute, 33 Second


नवी दिल्ली | प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचं एम्समध्ये निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. राजूच्या कुटुंबीयांनी मृत्यूला दुजोरा दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. राजू यांना बराच काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना येथे आणण्यात आलं. गेल्या 42 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

1989 मध्ये रिलीज झालेल्या मौने प्यार किया या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरापासून त्यांना वारंवार झटके येत होते. डॉक्टरांनी त्याच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले तेव्हा मेंदूच्या एका भागात सूज दिसून आली.

राजू यांच्यावर एम्समध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली, ज्यामध्ये हृदयाच्या मोठ्या भागात 100% ब्लॉकेज आढळून आले. राजू यांच्या पश्चात पत्नी शिखा, मुलगी अंतरा, मुलगा आयुष्मान, मोठा भाऊ सीपी श्रीवास्तव, लहान भाऊ दीपू श्रीवास्तव, पुतणे मयंक आणि मृदुल असा परिवार आहे.

राजू यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. कामानिमित्त दिल्लीतील पक्षातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीत पोहोचले होते. दिल्लीच्या साउथ एक्स येथील कल्ट जिममध्ये तो सकाळी वर्कआउट करत होता. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

थोडक्यात बातम्या- 

किंमत कमी आणि दर्जेदार फिचर्स, ‘या’ फोनच्या एन्ट्रीनं बाजारात मोठा धमाका | Lava Blaze Pro

“पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा”

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × four =