कॉमेडियन राजू श्रीवास्तवचा ब्रेन डेड

Read Time:2 Minute, 36 Second

नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा अतिशय चिंताजनक झाल्याची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितल्यानुसार कुटुंबाला आता चमत्काराची अपेक्षा आहे. डॉक्टरांनीही आता उत्तर दिले आहे. त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केल्याचे सुनील पाल यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार कोलकत्याहून न्युरोलॉजिस्ट डॉ. पद्मा श्रीवास्तव यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे.

रात्री उशिरापासून त्यांना वारंवार झटके येत होते. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले, तेव्हा मेंदूच्या एका भागात सूज दिसून आली. त्यांचे मोठे भाऊ सीपी श्रीवास्तव यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या मेंदूला सूज आल्याने पाणी आढळले आहे. डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. कुटुंबातील सदस्य आणि अनेक नातेवाईक दिल्ली एम्समध्ये पोहोचले आहेत.

दुसरीकडे राजू श्रीवास्तव यांच्यासाठी औषधोपचारांसह देवाला साकडे घातले जात आहेत. काशी विश्वनाथ धाम आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात महामृत्यूंजर मंत्राचा जप केला जात आहे. राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट २०२२ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. उपचारांमुळे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. पण ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत. ४ दिवसांपूर्वी गायक कैलाश खेर यांनीही २१ गुरुजींना राजू श्रीवास्तव यांच्यासाठी मृत्युंजय जप करण्यास सांगितले होते. राजू यांच्या उत्तम आरोग्यासाठी आता कुटुंबीय देवाकडे प्रार्थना करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × five =