July 1, 2022

केरळमध्ये मुसळधार पाऊस

Read Time:1 Minute, 51 Second

कोच्ची : केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात शनिवार दि. १६ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याच्या अधिका-यांनी रेड अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळच्या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान कार्यालयाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर सारख्या जिल्ह्यांमध्ये या काळात जास्तीत जास्त पाऊस पडू शकतो. केरळ किनारपट्टीवरील दक्षिण -पूर्व अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे, १७ ऑक्टोबर (रविवार) पहाटेपर्यंत राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, १८ ऑक्टोबर रोजी विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि १९ ऑक्टोबरच्या सकाळी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 − seven =

Close