January 21, 2022

केजरीवालांना कोरोना; दिल्लीत विकेण्ड कर्फ्यू

Read Time:2 Minute, 8 Second

नवी दिल्ली : कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले असल्याने मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी दिल्लीत अखेर विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. राजधानीत शुक्रवार दि. ७ जानेवारी सकाळी १० ते सोमवार दि. १० जानेवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. सर्व सरकारी कर्मचा-यांना आता घरुन काम करावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना यामधून वगळण्यात आले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पत्रकार परिषद घेत निर्बंधांची माहिती दिली आहे.

महत्वाचे म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सौम्य लक्षणे जाणवत असून, घरात स्वत:ला विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता दिल्लीत विकेण्ड कर्फ्यू जाहीर करण्यात आल्याने परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दिल्लीत मंगळवारी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होता. या बैठकीनंतरच हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी दिल्लीत कोरोनाचे ४०९९ रुग्ण आढळले होते. दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता डीडीएएमची एक बैठकदेखील आयोजित करण्यात आली. या बैठकीत कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 1 =

Close