January 19, 2022

केंद्र सरकार सातत्याने खोटे बोलतेय…

Read Time:2 Minute, 10 Second

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ होतोय. मोदी सरकारकडे कुठलीही रणनीती नाही. मिस्टर ५६ इंच घाबरले आहेत. आपल्या संवेदना सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांसोबत आहेत. तर केंद्र सरकार सतत खोटे बोलत आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

मणिपूरमध्ये चुराचांदापूर जिल्ह्यात अतिरेक्यांनी आसाम रायफल्सचे कमांडींग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी आणि मुलाची हत्या केली. या हल्ल्यात ४ जवानही शहीद झाले. या हल्ल्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. केंद्रातील मोदी सरकार देशाची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शहीदांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो. देश शहीदांचे बलिदान विसरणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर शुक्रवारीही हल्लाबोल केला होता. चीनविरोधात केंद्र सरकारकडे कुठलिही रणनीती नाही. सरकार एकामागून एक खोटे बोलत आहे. चीनच्या मुद्यावर परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्य दलांच्या प्रमुखांचे भिन्न मते आहे, अशी टीका राहुल गांधी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + 2 =

Close