June 29, 2022

केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसचे जनजागरण

Read Time:4 Minute, 45 Second

लातूर : प्रतिनिधी
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून अर्थव्यवस्था उध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार तसेच माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रविवार दि. १४ नोव्हेंबर रोजी लातुरातील प्रभाग क्रमांक १० येथून पंधरा दिवसांच्या जनजागरण अभियानाला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा लातूरचे प्रभारी डॉ. जितेंद्र देहाडे आणि साहप्रभारी फरीद देशमुख यांच्या प्रमूख उपस्थितीत सुरुवात झाली.

या अभियानाच्या सुरुवातीला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रभाग क्रमांक १० मध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीतून प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली. केंद्र सरकारचे नोटबंदी, जीएसटी, महागाई, सरकारी कंपन्यांची विक्री अशा अनेक धोरणाबद्दल नागरिकांशी संवाद साधून केंद्र सरकारचे हे धोरण देशासाठी किती घातक आहे याबद्दल माहिती देण्यात आली . या अभियानामध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी या अभियानाबद्दल उपस्थितांना माहिती देताना सांगितले की, हे अभियान लातूर शहरात १५ दिवस चालणार असून प्रत्येक प्रभागात प्रभात रॅलीद्वारे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. पदयात्रा बार्शी रोड वरुन निघून संपूर्ण प्रभागात फिरत आंबा हनुमान अंबेजोगाई रोड येथे पथनाट्य सादरीकरण करुन समारोप झाला.

यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ, कांचन आजनीकर, अ‍ॅड. समद पटेल, चंद्रकांत धायगुडे, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे, धोंडिराम यादव, महेश काळे, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, अ‍ॅड. फारुक शेख, सुपर्ण जगताप, रमेश सूर्यवंशी, नागसेन कामेगावकर, बाळासाहेब देशमुख, दत्ता सोमवंशी, नेताजी बादाडे, युनुस मोमिन, रत्नदीप अजनीकर, विजय टाकेकर, दगडूआप्पा मिटकरी, सचीन मस्के, संजय ओहोळ, डॉ. बालाजी सोळुंके, बी. एम. घोलप, ज्ञानेश्वर सागावे, रघुनाथ मदने, बप्पा मार्डीकर, बिभीषण सांगवीकर, प्रा. एम. पी. देशमुख, कुणाल श्रंगारे, तबरेज तांबोळी, विकास कांबळे, अविनाश बट्टेवार, करीम तांबोळी, सुलेखा कारेपुरकर, कुणाल वागज, अमित जाधव, सागर मुसांडे, अभिषेक पतंगे, अभिजीत ईगे, अकबर माडजे, एम. एच. शेख, बालाजी झिपरे, यशपाल
कांबळे, राहूल डुमणे, हमीद बागवान आकाश भगत आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

five + seventeen =

Close