August 19, 2022

केंद्र सरकारकडून दबावतंत्र

Read Time:2 Minute, 52 Second

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी १ सप्टेंबर रोजी नाट्यमय प्रकार घडला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने अपहरण करून ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.

सीबीआयने २० मिनिटे चौकशी करून चतुर्वेदी यांना सोडून दिले. त्यानंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले. तसेच सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली. यामुळे सगळ्या प्रकरणाला एक वेगळे आणि नाट्यमय वळण मिळाले. वकिलांनी सीबीआय अधिका-याला पैसे देऊन प्राथमिक चौकशी अहवाल लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

जावयावर घरात जाऊन कारवाई
राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात संताप व्यक्त केला आहे. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, मात्र केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे. केवळ महिला घरात असताना देशमुख यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली हे चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पूर्ण ताकदीने लढू
यापूर्वी अशाप्रकारची दडपशाही मी पाहिलेली नाही. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते? ती कशी केली जाते? सुडाचे राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणार नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देश चालायला हवा, ते महाराष्ट्रात होताना दिसत नाही. पण आम्ही याच्याविरोधात पूर्ण ताकदीने लढू, असेही त्या म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 5 =

Close