January 19, 2022

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेडात

Read Time:1 Minute, 30 Second

नांदेड: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा.१७ रोजी नांदेड जिल्हयाच्या दौ-यावर येत असून मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने निजामाच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्त केले होते. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे औचित्य साधून देशाचे गृहमंत्री अमित शहा आज नांदेड दौ-यावर येत आहेत.

मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय,केंद्रीय रिजर्व पोलिस बल येथे अ.भा.वृक्षारोपण अभियान २०२१ अंतर्गत वृक्षारोपण व सैनिकांचे संमेलन या कार्यक्रमास ना.शहा यांची उपस्थिती राहणार आहे. या दौ-याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह पोलिस विभागाने तयारी केली आहे. दरम्यान तेलंगनातील म्हैसा येथे त्यांची सभा असल्याचे सांगितल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × three =

Close