January 21, 2022

कृषी कायदे परत घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय! संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस

Read Time:2 Minute, 36 Second

गेल्या वर्षभरापासून विशेषत: पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी दिल्लीच्या सिमांवर आंदोलन करत आहे. गेल्या वर्षीच्या मानसुन सत्रात केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांना रद्द करणे ही या शेतकर्‍यांची महत्वाची मागणी होती. शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस ऊग्र रुप धारण करत होते. आगामि काळातील निवडणुकांवरसुद्धा शेतकरी आंदोलनाचा प्रभाव पडणे निश्चित होता. या पार्श्वभूमिवरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

दिल्ली सिमेवरील शेतकर्‍यांनी आंदोपन थांबवुन आपापल्या घरी परतावे असे आवाहनसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. मात्र संसदीय सत्रात कायदे मागे घेण्यावर शिक्कामोर्तब होईपर्यंत दिल्ली सिमांवरुन परतण‍ार नाही असा निर्णय शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी जाहीर केलाय.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता संमिश्र प्रतिक्रिया ऊमटायला सुरुवात झालीय. कृषी कायद्यांच्याविरोधातील लोकांनी यांस आंदोलनाचा विजय म्हटले आहे. अखेर सरकारला झुकण्यास कारणिभुत ठरवुन लोकशाहीचा विजय झाला असल्याचे मतसुद्धा अनेकांनी नोंदवले आहे.

भाजपाकडून मात्र अद्यापही कृषी कायद्यांच्या समर्थनार्थच प्रतिक्रिया येत आहे. गरीब तबक्यातुन येणार्‍या शेतकर्‍यांचे हे नुकसान असून दलालांचा विजय असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

निवडणुकांमध्ये होणार्‍या पराजयामुळे भाजपाला झुकावे लागले असल्याचे महाराष्ट्रातील महाविकासआघाडीकडून सांगितले जाते आहे. आगामि काळातील ऊ.प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका बघता, भाजपाला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचा संजय राऊत आणि नवाब मलिक म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 − one =

Close