January 21, 2022

कुटुंबातील तिघांची हत्या करत आरोपीची आत्महत्या

Read Time:1 Minute, 0 Second

गोंदिया : एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करून नंतर आरोपीने स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी गावात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रेवचंद डोंगरू बिसेन (वय ५१), मालता रेवचंद बिसेन (वय ४५), पौर्णिमा बिसेन (वय २०), तेजस रेवचंद बिसेन (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळपासून बिसेन यांच्या घरात कोणतीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे शेजारच्यांनी चौकशी केली असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =

Close