किनवटमध्ये 2 लाख 30 हजारांची चोरी – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरास कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या एका कुटूंबाला हा प्रवास महागात पडला आणि त्याचे घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 29 हजार 970 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
डॉ.सुनिल इंदलसिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर सरस्वती मंदिराजवळ शहिद भगतसिंघनगर किनवट येथे आहे. 12 जून रोजी ते आपले घर बंद करून बाहेरगावी गेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून कपाटातील रोख रक्कम 40 हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 29 हजार 970 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. किनवट पोलीसांनी हा चोरीचा प्रकार गुन्हा क्रमांक 155 /2024 नुसार दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक झाडे अधिक तपास करीत आहेत.


Post Views: 29


Share this article:
Previous Post: मुखेडमध्ये जमीनीच्या खरेदी खतात खोट्या चतु:सिमा दाखवल्या

June 13, 2024 - In Uncategorized

Next Post: शहरात ड्रेनेज, नालेसफाई मोहिम राबवा, अन्यथा आंदोलन -बंटी लांडगे

June 13, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.